IND vs SA: एक छोटीशी चूक अन् हुकला शुबमन गिलचा मोठ्ठा रेकॉर्ड; अवघ्या २ धावांवर झाला बाद
भारतीय संघाची आजपासून दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान आफ्रिकेने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय सार्थ ठरला. भारताकडून सलामीला आलेला कर्णधार रोहित शर्मा ५ धावांवर माघारी गेला तर यशस्वी जैस्वाल १७ धावा काढून बाद झाला. सलामीवीर बाद झाल्यानंतर, भारताचा नव्या दमाचा फलंदाज शुबमन गिल मैदानात आला. त्याच्याकडून चांगल्या आणि मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तसे होऊ शकले नाही. एका छोटाशा चुकीमुळे शुबमन गिल बाद झाला आणि त्याचे एक मोठे रेकॉर्ड हुकले.
भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केले, तेव्हापासून तो टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमधील महत्त्वाचा भाग बनला आहे. पहिली कसोटी सुरू होण्याआधी पर्यंत त्याने भारतीय संघासाठी १८ कसोटी सामन्यांमध्ये ९६६ धावा केल्या. त्यात २ शतके आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात ३४ धावा केल्या असत्या तर त्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण झाल्या असत्या. पण बाहेरचा चेंडू खेळण्याची चूक त्याला महागात पडली आणि त्यामुळे अवघ्या दोन धावांवर त्याला माघारी परतावे लागले.#bcci
Comments
Post a Comment